सैन्य भरती प्रक्रिया नागपुर येथे मानकापूर क्रीडा संकुलात

सैन्य भरती प्रक्रिया नागपुर येथे मानकापूर क्रीडा संकुलात

गडचिरोली, दि.06: भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. विदर्भातील दहा जिल्हयांमध्ये यापुर्वीच नोंदणी झालेल्या पुरुष उमेदवारांसाठी 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2022 या कालावधीत जिल्हा निहाय निवड प्रक्रिया आता मानकापूर क्रीडा संकुल येथे पार पडणार असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांनी माध्यमांना दिली आहे.

‘अग्निवीर,अर्थात सैन्य भरती नोंदणी करण्यासाठी दिलेल्या कालावधीमध्ये विदर्भातील दहा जिल्हयांमधून 59 हजार 911 उमेदवारांची नोंदणी झाली आहे. नोंदणी झालेल्या उमेदवारांचीच निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या शारीरीक स्पर्धा व अन्य बाबींसाठी नागपूर शहरातील मानकापूर क्रीडा संकुल हे योग्य स्थळ असून याच ठिकाणी ही प्रक्रीया पार पडली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा व अन्य्‍ व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना त्यांनी प्रत्यक्ष पाहणी दरम्यान दिल्या.