गडचिरोली || पीएम किसान योजनेच्या लाभासाठी ७ सप्‍टेबर पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक जिल्‍हयातील 50 हजार शेतकऱ्यांची अद्यापही ई-केवायसी प्रक्रिया बाकी….

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी ७ सप्‍टेबर पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक

जिल्‍हयातील 50 हजार शेतकऱ्यांची अद्यापही ई-केवायसी प्रक्रिया बाकी

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना (ग्राहकांची ओळख) प्रमाणीकरण बाबत कार्यशाळा संपन्न

गडचिरोली, दि.05: जिल्हाधिकारी गडचिरोली कार्यालय परिसरात नियोजन सभागृहामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ई-केवायसी बाबत जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली मार्फत जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांचेकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत दीड लाख पात्र खातेदार असून आत्तापर्यंत 99 हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली आहे. अद्यापही 50 हजार शेतकरी खातेदार यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. जर शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली नाही तर प्रति शेतकरी दोन हजार रुपये प्रमाणे मिळणाऱ्या मदतीचा फायदा संबंधित खातेदारांना मिळणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र सर्व शेतकऱ्यांनी दिनांक 7 सप्टेंबर पूर्वी आपली केवायसी पूर्ण करावयाचे आहे.

याबाबत कृषी आयुक्तालयातील उपायुक्त गणना यांनी जिल्ह्यातील क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांना पीएम किसान इ केवायसी बाबत मार्गदर्शन केले. ई-केवायसी प्रलंबित खातेदारांचे पुढील दोन दिवसांमध्ये सूक्ष्म नियोजन करून सर्व पात्र खातेदारांचे ई केवायसी करण्यासाठी कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले व खातेदार निहाय यादी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून मोहीम स्वरूपात 7 सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले.

त्यासाठी खालील दोन पध्‍दतीने ई-केवायसी करता येईल

लाभार्भी स्‍वतः https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील फार्मर्स कॉर्नर या टॅबमध्ये किंवा पीएमकिसान अँपद्वारे ओटीपी द्वारे मोफत करता येईल. पुढील लिंक व्‍दारे डायरेक्ट केवायसी टॅब ओपन होईल https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx . ग्राहक सेवा केंद्र (CSC) येथेही ईकेवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल.