जिल्हा कारागृहात आरोग्य तपासणी शिबिर Ø कारागृहातील 279 बंद्यांना मोफत समुपदेशन,आरोग्य तपासणी व औषधोपचार

जिल्हा कारागृहात आरोग्य तपासणी शिबिर

Ø कारागृहातील 279 बंद्यांना मोफत समुपदेशन,आरोग्य तपासणी व औषधोपचार

चंद्रपूर, दि. 2 सप्टेंबर : जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर तर्फे जिल्हा कारागृह येथील बंद्यांकरीता सर्वसमावेशक तपासणी व औषध वितरण आरोग्य शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले.

या आरोग्य शिबिरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्थिरोग तज्ञ, नाक, कान व घसा तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, दंत शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ञ, आयुष वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी) नेत्र चिकित्सा अधिकारी, चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ विभाग, एनसीडी विभाग व टाटा चमु, जिल्हा कार्यक्रम समन्वयक (एनसीडी), समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता व अधिपरिचारिका यांच्याद्वारे जिल्हा कारागृहातील 253 पुरुष, 25 महिला व एक बालक अशा एकूण 279 व्यक्तींना समुपदेशन, आरोग्य तपासणी व औषधोपचार करून आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराचे नियोजन व व्यवस्थापन जिल्हा कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे व कारागृह वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित डांगेवार यांनी केले.