ईश्वरचिठ्ठीद्वारे ‘ तिरंग्यासोबत सेल्फी ‘ स्पर्धेचे विजेते घोषित राजवी राजेश टोंगे यांना प्रथम बक्षीस  

ईश्वरचिठ्ठीद्वारे ‘ तिरंग्यासोबत सेल्फी ‘ स्पर्धेचे विजेते घोषित राजवी राजेश टोंगे यांना प्रथम बक्षीस  

चंद्रपूर १ ऑगस्ट – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात आलेल्या ” तिरंग्यासोबत सेल्फी ” Selfie with Tiranga स्पर्धेत राजवी राजेश टोंगे यांना प्रथम बक्षीस मिळाले आहे. फेसबुक लाईव्हद्वारे स्पर्धेचा ड्रॉ शाळकरी मुलांच्या हस्ते ईश्वरचिठ्ठी माध्यमातुन काढण्यात आला.

या सेल्फी स्पर्धेचे विजेते तुकुम येथील राजवी राजेश टोंगे यांना प्रथम, मोहम्मदीया नगर येथील एमडी नजील यांना द्वितीय तर बाबुपेठ येथील यश टोंगे यांना तृतीय बक्षीस मिळाले आहे. सदर विजेत्यांना अनुक्रमे रु.११,०००/-, रु.७०००/-, रु. ५०००/- रुपयांची रोख बक्षिसे पुढे होणाऱ्या कार्यक्रमात देण्यात येणार आहे.सदर कार्यक्रमाची माहीती विजेत्यांना संपर्क करून देण्यात येईल.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शासन निर्देशानुसार १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान तीन दिवस देशव्यापी ‘घरोघरी तिरंगा ’ मोहीम राबवण्यात आली होती देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा अभियानाचा उद्देश होता. तिरंग्यासोबत सेल्फी स्पर्धेअंतर्गत नागरीकांना स्वतः च्या घरी लावलेल्या तिरंग्यासोबतचे क्षण सेल्फीद्वारे टिपुन चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे दिलेल्या गुगलशीट वर अथवा QR कोड स्कॅन करून पाठवायचे होते. शहरात जनजागृती व्हावी या उद्देशानं मनपातर्फे ही स्पर्धा राबविण्यात आली होती. स्पर्धेस मोठ्या प्रमाणात स्पर्धकांचा सहभाग लाभला.