आज जागतिक जेष्ठ नागरिक दिनाचे आयोजन

आज जागतिक जेष्ठ नागरिक दिनाचे आयोजन

            भंडारा,दि.30: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच आरोग्य विभाग यांचे संयुक्त विद्यमाने 1 ऑक्टोबर 2021 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन भंडारा येथील सभागृहात सकाळी 11 वाजता जागतिक जेष्ठ नागरिक दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
            सदर कार्यक्रमास ॲङ. श्रीमती पशिने ह्या जेष्ठ नागरिकांना विधी व सेवा व डॉ. बांडेबुचे हे जेष्ठांच्या आरोग्यासंबंधी काळजी घेणे या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आरोग्य विभागातर्फे जेष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. भंडारा जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांनी सदर कार्यक्रमास कोविड-19 च्या नियमाचे पालन करुन उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त डॉ.मंगेश वानखडे यांनी केले आहे.