1 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत रक्तदान शिबिरांचे आयोजन

1 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत रक्तदान शिबिरांचे आयोजन

चंद्रपूर दि. 28 सप्टेंबर : दरवर्षी 1 ऑक्टोंबर हा राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या  दिनानिमित्त नियमित रक्तदात्यांचे मुबलक प्रमाणात सुरक्षित रक्त व रक्तघटके रुग्णास मिळण्याकरीता व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येते. रुग्णसेवेत सुरक्षित रक्ताचा अखंडीत रक्तपुरवठा होत असल्यामुळे रुग्णास जीवनदान ठरते. रक्त हे कृत्रिम प्रकारे तयार करता येत नाही. ते फक्त स्वेच्छिक रक्तदात्याच्या माध्यमातून त्याचा पुरवठा होऊ शकतो. रक्तदात्यांचे रक्त हे सुरक्षित व आरोग्याने सुदृढ असलेल्या रक्तदात्यांचे रक्त हे बहुमूल्य असते.
कोविडजन्य परिस्थितीमुळे रक्ताची मागणी कमी असली तरी रक्तक्षयाच्या अनेक व्याधीमध्ये जसे की, थॅलॅसिमिया, सिकलसेल इत्यादी आजार तथा गरोदरपणात व अपघातजन्य परिस्थितीमध्ये रक्ताची मागणी ही सतत वाढत असते.
त्यामुळे रक्तदात्यांना प्रोत्साहित करण्याकरिता राष्ट्रीय स्तरावरून राष्ट्रीय रक्तसंक्रमण तर राज्यस्तरावरून राज्य रक्त संक्रमण परिषद 1 ते 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत महिन्याभरात स्वैच्छिक रक्तदान चळवळीद्वारे विविध रक्तदान शिबिराचे तथा रक्तपेढीमध्ये स्वेच्छिक रक्तदात्यांचे रक्तदान कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. ज्या स्वेच्छिक रक्तदात्यांनी कोविडचे लसीकरण केले आहे, असे रक्तदाते लसीकरणाच्या 14 दिवसानंतर नियमितपणे रक्तदान करू शकतात.
हा आहे राष्ट्रीय स्वेच्छिक रक्तदानाचा उद्देश
सुरक्षित रक्ताचा पुरवठा अविरतपणे रक्तपेढीत उपलब्ध असल्यास रुग्णांना जीवनदायी ठरू शकते. यासाठी ज्या स्वेच्छिक रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच ज्या रक्तदात्यांने पहिल्यांदा रक्तदान केले आहे, अशा रक्तदात्यांना रक्तदान करण्यास प्रोत्साहित करणे. जागतिक, राष्ट्रीय, राज्यस्तरीय तथा स्थानिकरीत्या कार्यरत असलेल्या सर्व शासकीय यंत्रणांना स्वेच्छा रक्तदानाकरिता प्रोत्साहित करून रक्ताच्या स्त्रोतात मुबलकता निर्माण करणे. स्वेच्छिक रक्तदान शिबिर चळवळीसाठी व्याख्यान कार्यशाळेचे आयोजन करणे. महाविद्यालयीन विद्यार्थी, खेळाडू, पोलीस तथा अन्य विभागात कार्यरत असलेल्यांना स्वेच्छिक रक्तदान चळवळीचे महत्व रुजावे या दृष्टिकोनातून व्यापक प्रमाणात प्रसिद्धी साहित्याच्या माध्यमातून प्रोत्साहित करणे. शैक्षणिक संस्थेमध्ये रक्तदान चळवळीचे महत्त्व पटवून देणे. रक्तदान चळवळीचे घोषवाक्य सार्वजनिक ठिकाणी दर्शनी भागात पेंटिंग करून समाजात जनजागृती करणे.
तसेच स्थानिक सेवाभावी संस्था व शासकीय संस्थेच्या मदतीने व्याख्यानमाला व पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करणे. त्यासोबतच विनामोबदला स्वेच्छिक रक्तदात्यांना रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करून अशा रक्तदात्यांची स्त्रोत 100 टक्के निर्माण करणे व रक्ताच्या तुटवड्यामुळे रक्तपेढी पर्यायी रक्तदाते मागणीचे प्रमाण निरंक करणे हे या चळवळीमागचा मुख्य उद्देश आहे.
 तरी या स्वेच्छिक रक्तदानाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे व ही रक्तदान चळवळ यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आ