मुला-मुलींनी न घाबरता अन्याय,अत्याचार विरोधात पाऊल उचलावे ; पोलिस प्रशासन २४ तास सेवेत – योगेश घारे पोलिस निरीक्षक सिंदेवाही

सिंदेवाही पोलिसांचा उपक्रम मुला मुलींकरिता जनजागृती करणेबाबत मार्गदर्शन पर शिबिर.

पोलिस निरीक्षक योगेश घारे यांची परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक प्रयत्न सुरुच.

मुला – मुलींनी न घाबरता अन्याय,अत्याचार विरोधात पाऊल उचलावे ; पोलिस प्रशासन २४ तास सेवेत – योगेश घारे पोलिस निरीक्षक सिंदेवाही

सिंदेवाही पोलीस तालुक्यातील सर्व शाळा व कॉलेजमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी मध्ये जनजागृती करीत आहेत.

काल दिनांक 16/09/2021 रोजी सर्वोदय कन्या महाविद्यालय सिंदेवाही या शाळेतील मुला मुलींकरिता जनजागृती करणेबाबत मार्गदर्शन पर शिबिर घेण्यात आले.मुला-मुलींना महिला अत्याचार ,सायबर गुन्हे ,मुली व महिलांचे समाजामध्ये होत असलेले लैंगिक शोषण,व्यसनांपासून दूर राहणे, स्पर्धा परीक्षा ,महिलां संबंधित कायद्यामधील तरतुदी, पोलीस सारथी उपक्रम पोलीस काका, पोलीस दीदी याबाबत माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे शाळा कॉलेजमधील मुलींना त्यांचे शाळेमध्ये गावांमध्ये त्याच प्रमाणे प्रवासादरम्यान होत असलेल्या त्रासा बद्दल पोलीस काका, पोलीस दीदी यांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले. शालेय मुलींना गूड टच बड टच, सायबर गुन्हे याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले. तसेच समाजामध्ये होत असलेल्या लैंगिक शोषणा करिता न घाबरता न लाजता पोलीस काका, पोलीस दीदी यांना माहिती द्यावी असे आव्हान देखील करण्यात आले. सिंदेवाही पोलिसांच्या या उपक्रमामुळे शालेय मुलामुलींनी सुरक्षित पणाची भावना निर्माण होऊन पोलिसांचे आभार मानले आहे.