समता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था सिंदेवाहीची ऑनलाईन आमसभा संपन्न

समता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था सिंदेवाहीची ऑनलाईन आमसभा संपन्न

दिनांक 12 सप्टेंबर 2021रोजी रविवारला समता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था सिंदेवाहीची ऑनलाईन आमसभा शिक्षक सहकारी सोसायटी सिंदेवाही येथे घेण्यात आली. क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले तथा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या पूजनाने आमसभेची सुरुवात करण्यात आली .या सभेच्या सुरुवातीलाच इयत्ता दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणसंपन्न विद्यार्थ्यांचा प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक याप्रमाणे गौरवचिन्ह सन्मानपत्र व रोख रक्कम देवून गुणगौरव करण्यात आला . तसेच आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचारी तथा संस्थेचे प्रवर्तक असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शाल सन्मानचिन्ह सन्मानपत्र साडीचोळी देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या विद्याविभूषित डॉक्टर राजेश डहारे सर तथा डॉक्टर प्रेमकुमार खोब्रागडे सर यांचा शाल सन्मानचिन्ह सन्मानपत्र साडीचोळी देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. पत संस्थेच्या एका प्रवर्तकाचे मागिल महीण्यात दुःखद निधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . तसेच दिवंगताच्या पत्नीला सांत्वनपर साडीचोळी देऊन सांत्वन करण्यात आले. आमसभेच्या विषय पत्रिकेनुसार मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले .आम सभेचे प्रास्ताविक डॉक्टर प्रेमकुमार खोबरागडे सर यांनी केले तर संस्थेचा जमा खर्च ताळेबंद नफा विनियोग यांचे वाचन संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक प्रताप नगराळे यांनी केले .सभासदांच्या हितासाठी योग्य ते निर्णय आमसभेत घेण्यात आले .पतसंस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ आमसभेला उपस्थित होते .सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य समाधानकारक उत्तरे देण्यात आली. ऑनलाइन आमसभेला बहुसंख्य सभासदांनी उपस्थित राहून आपल्या शंका प्रश्न सूचना व मार्गदर्शन केले . तसेच संस्थेच्या विकासासाठी सर्वांनी एकोप्याने कार्य करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. या संपूर्ण आम सभेचे सूत्रसंचालन पतसंस्थेचे सहसचिव आयुष्यमान दीपक मोटघरे सर यांनी केले तर सर्वांचे आभार श्री हिरालाल पाटील पत संस्थेचे कोषाध्यक्ष यांनी व्यक्त केले .ही आमसभा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली .