जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सभा संपन्न

जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सभा संपन्न

भंडारा, दि. 29 : नुकतीच ॲट्रासिटी कायद्याअंतर्गत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. अनु.जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत जुलै 2022 अखेर घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले.

सभेमध्ये सन 1989 पासून घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये जुलै 2022 अखेरपर्यंत एकूण 1058 गुन्हे दाखल असून त्यापैकी 824 प्रकरणे अर्थसहाय्यासाठी पात्र आहेत. एकूण 821 प्रकरणात रु. 702.01 लक्ष अर्थसहाय्य मंजूर असून 3 प्रकरणे आवश्यक कागदपत्रा अभावी अर्थसहाय्यास प्रलंबित आहेत.

एप्रिल 2022 ते जुलै 2022 अखेर एकूण 12 प्रकरणे दाखल असून त्यापैकी 10 प्रकरणात दोषारोप अहवाल मा. न्यायालयात दाखल करण्यात आलेले आहेत तर उर्वरीत 2 प्रकरणांपैकी 1 प्रकरणात मा. उच्च न्यायालयात FIR रद्द करीता तर एक प्रकरणात पोलीस तपास सुरु असल्याने प्रलंबित आहेत. सन 2019-20 ते 2021-22 अखेरपर्यंत मंजूर परंतु अर्थसहाय्या अभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणात रु. 62.84 लक्ष चा निधी प्राप्त झाला असून 51 लाभार्थ्यांना वाटप करण्याची कार्यवाही सुरु आहे.

सभेस समितीच्या सदस्य सचिव सहा. आयुक्त, समाज कल्याण सुकेशिनी तेलगोटे व इतर शासकीय/ अशासकीय सदस्य उपस्थित होते.