धनगर समाजातील महिलांकरीता मार्जिन मनी योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन

0

धनगर समाजातील महिलांकरीता मार्जिन मनी योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन

भंडारा, दि. 29 : 2020-21 या वर्षापासुन केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजने अंतर्गत धनगर समाजातील महिलांकरीता मार्जिन मनी उपलब्ध करुन देणेबाबतच्या योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे.

या योजनेतंर्गत महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजातील महिलांकरीताच्या सवलतीस पात्र नवउद्योजक महिला यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजुर केल्यानंतर उर्वरित सबसिडी च्या अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मुल्याच्या 15 टक्के हिस्सा (अनुदान) शासनामार्फत देण्यात येते. यासाठी बॅकेमार्फत प्रकल्प कर्ज मंजुर धनगर समाजातील महिलांनी सहाय्यक आयुक्त् समाज कल्याण कार्यालय भंडारा येथे संपर्क करावा, असे आवाहन सुकेशिनी तेलगोटे सहाय्यक आयुक्त, यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here