नवउद्योजकांनी स्टँड अप इंडिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नवउद्योजकांनी स्टँड अप इंडिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

भंडारा, दि. 29 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमीत्त् केंद्र शासनाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटाकांतील ही योजना आणली आहे. जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील 18 वर्षावरील नवउद्योजक यांना 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजने अंतर्गत 75 टक्के कर्ज मंजुर केल्यानंतर उर्वरित सबसिडी च्या अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प् मुल्याच्या 15 टक्के हिस्सा (अनुदान) शासना मार्फत देण्यात येते. यासाठी प्रकल्प कर्ज मंजुर पात्र इच्छुक नवउद्योजकांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय येथे संपर्क करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण भंडारा यांनी केले आहे.