जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा

0

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा

भंडारा, दि. 23 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आज ओम सत्यसाई महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यात आला. प्राधिकरणामार्फत बरेच उपक्रम राबविण्यात येतात.

आंतरराष्ट्रीय युवा दिवसा निमित्ताने बोलतांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव बिजू बा. गवारे यांनी प्रत्येकाने नैतिक मुल्ये जोपासायला पाहिजे. देशाचे भवितव्य उज्वल करणे युवकांवरच आधारित असल्यामूळे प्रत्येक युवकांना देशाची आर्थिक, राजकीय तसेच सामाजीक परिस्थीतीची जाण असायला पाहिजे असे सांगितले. तसेच त्यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना एकमेकांशी कुटूंबासारखे रहायला पाहिजे. वरिष्ठ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. इंटरनेट तसेच सामाजिक माध्यमांचा वापर चांगल्यागोष्टींसाठी करावा. वाहतूकीचे नियमांचे पालन करायला पाहिजे. तसेच आंतरराष्ट्रीय युवा दिवस निमित्य रॅगिंग विरोधी कायदा व वाहतूकीचे नियमांबाबत कार्यक्रमात दिलेली माहिती इतरांना सुध्दा सांगण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.

ओम सत्यसाई महाविद्यालयाचे अध्यक्ष सुभाष वाडीभस्मे यांनी भारतीय संविधानातील तरतुदीनुसारच विविध कायद्यांची निर्मीती केलेली आहे. न्यायव्यवस्था सर्वांसाठी समान आहे. तसेच कायद्याचे ज्ञान घेणे सर्वांना आवश्यक आहे असे सांगितले. जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष आर. बी. वाढई यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा देवून त्यांच्या उत्तम भवितव्याकरिता मार्गदर्शन केले. जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरिक्षक भुषण कोळी यांनी युवा हे अंमलीपदार्थाच्या व्यसनी जात आहेत. मोबाईलचा अतिवापर करत आहेत. त्यामुळे मानसीक व शारिरिक परिणाम होउून त्यांची सहनशक्ती कमी होत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी 18 वर्षाखालील व्यक्तींनी वाहन चालविणे बेकायदेशीर आहे. परवानाशिवाय वाहन चालवू नये व वाहतुकीचे नियमांचे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

अधिवक्ता शुभांगी नंदनवार यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्याचा हेतु व त्याचा उद्देश विषद केले. तसेच त्यांनी युवकांना अंमलीपदार्थाच्या व्यसनापासून दुर राहण्याचे आवाहन केले. अधिवक्ता नंदादेवी गभणे यांनी रॅगिंगबद्दल मार्गदर्शन करतांना शाळेत किंवा महाविद्यालयात कोणत्याही विद्यार्थ्यांचा अपमान करणे, छळ करणे किंवा त्याला त्रास देणे म्हणजे रॅगिंग होय. असे कृत्य करणे अपराध असून महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंध अधिनियम, 1999 नुसार असे कृत्य करणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षा तसेच दंडाची तरतूद आहे असे सांगितले तसेच त्यांनी सदर अधिनियमाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान घ्यावे व रॅगिंग करणाऱ्याचा तक्रार करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे शेवटी अंमली पदार्थाचे सेवन न करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमाचे शेवटी अंमली पदार्थाचे सेवन न करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओम सत्यसाई महाविद्यालयाचे प्रा. दिलीप पाटील, सुत्रसंचालन प्रतीक धुते व आभार प्रदर्शन श्रीमती ज्योती रामटेके यांनी केले. सदर कार्यक्रमात रोहीनी रामटेके, ओम सत्यसाई महाविद्यालयाचे सर्व प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here