आज स्टार्ट अप यात्रा साकोलीत

आज स्टार्ट अप यात्रा साकोलीत

भंडारा, दि. 23 : नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या हीच स्टार्टअप यात्रा साकोली तालुक्यात 24 ऑगस्ट रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वैनगंगा पॉलीटेक्निक कॉलेज, शासकीय पॉलीटेकनिक कॉलेज, सेंदुरवाफा, एम.बी. पटेल कॉलेज येथे येणार आहे.

दिनांक 25/08/2022 रोजी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत स्टार्टअप यात्रा हि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लाखांदूर, यशवंतराव चव्हाण कॉलेज, लाखांदूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, लाखांदूर व इत्यादी ठिकाणी उपस्थित राहणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये 2 ते 5 वाजेपर्यंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पवनी, हरिशचंद्र पाटील सावरबांधे कॉलेज, पवनी, संत जगनाडे महाराज टेक्निकल इंन्स्टीट्युट पवनीव इत्यादी ठिकाणी उपस्थित राहणार आहे.

तालुकास्तरीय प्रचार व प्रसिध्दी झाल्यानंतर जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धा व एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे. त्यामध्ये नवउद्योजकतेबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उद्योजक व तज्ज्ञ मार्गदर्शक यांची व्याख्याने होणार आहेत. तसेच नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पनांची सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर सर्वोत्तम कल्पना सादर करणाऱ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय परितोषीक वितरीत होणार आहे. सदरच्या निवड झालेल्या संकल्पनांना जास्तीत जास्त प्रसिध्दी मिळून नवउद्योजक होण्याची सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे. या महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेमध्ये जिल्हायातील जातीत जास्त युवक/युवतींनी नोंदणी करुन सहभागी होण्याचे आवाहन सुधाकर झळके, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांनी केले आहे.

या यात्रे दरम्यान प्रचार व प्रबोधन करुन यात्रेबाबतची संपूर्ण माहिती, नावीन्यपूर्ण संकल्पना, त्याचे इतर पैलू याबाबतची माहिती देण्यात येत आहे. नावीन्यपूर्ण कल्पना असलेले युवक-युवती आपल्या कल्पना यावेळी www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in या वेबसाईटवर नोंदवू शकतात.