भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमीत्त “स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश” विदर्भ विभाग खंड-1 व खंड-2 जिल्हा ग्रंथालय गडचिरोली येथे उपलब्ध

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमीत्त “स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश” विदर्भ विभाग खंड-1 व खंड-2 जिल्हा ग्रंथालय गडचिरोली येथे उपलब्ध

गडचिरोली, दि.19:- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमीत्त कार्यकारी संपादक व सचिव दर्शनिका महाराष्ट्र शासन मुंबई यांनी “स्वातंत्र सैनिक चरित्रकोश” विदर्भ विभाग खंड-1 व 2 च्या प्रति उपरोक्त संदर्भाकिंत पत्रान्वये या कार्यास उपलब्ध करून दिल्या आहेत.

सदरहु ग्रंथाचे जनसामान्य पर्यंत स्वातंत्र सैनिकाचा दैदिप्यमान इतिहास पोहचविण्याच्या दृष्टीने सदर ग्रंथ महत्वाचे आहेत, यात बरीच माहिती आहे. तरी वाचकांनी जिल्हा ग्रंथालय येथे संपर्क साधावा, असे प्र.जिल्हा ग्रंथालय अधिकारी, र. वा. शेंडे यांनी कळविले आहे.