कोविड व्हॅक्सीन अमृत महोत्सवातंर्गत अतिरिक्त लसटोचकासाठी चंद्रपूर जिल्ह्याला 57 लक्ष 75 हजार रू. निधी मंजूर

कोविड व्हॅक्सीन अमृत महोत्सवातंर्गत अतिरिक्त लसटोचकासाठी चंद्रपूर जिल्ह्याला 57 लक्ष 75 हजार रू. निधी मंजूर

Ø वन व सांस्कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलीत

चंद्रपूर, दि. 19 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत आजादी का अमृत महोत्सव 75 दिवस कोविड लसीकरण कार्यक्रमासाठी अतिरिक्त लसटोचक अर्थात व्हॅक्सिनेटर मनुष्यबळासाठी चंद्रपूर जिल्ह्याला रू. 57,75,000/- इतका निधी उपलब्ध करण्यात आला आहे. वन व सांस्कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे.

दि. 15 जुलै 2022 ते 30 सप्टेंबर 2022 या 75 दिवसांच्या कालावधीमध्ये कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सवा निमीत्य सर्व शासकीय कोविड लसीकरण केंद्रांवर 18 वर्षावरील सर्व पात्र नागरिकांना त्यांचा प्रिकॉशन डोस मोफत देण्यात येणार आहे. ही मोहीम राबविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याला अतिरिक्त लसटोचक यांची आवश्यकता असल्याने एकूण रू. 57,75,000/- निधीची आवश्यकता असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा राज्य कुटूंब कल्याण यांना कळविले होते. वन व सांस्कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मागणीच्या अनुषंगाने पाठपुरावा करून सदर निधी मंजूर करविला आहे. त्यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यात कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सवाअंतर्गत १८ वर्षावरील पात्र नागरिकांना त्यांचा प्रिकॉशन डोस आता मोफत उपलब्ध होणार आहे.