प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना

भंडारा, दि. 12 : आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना जिल्हयामध्ये सन 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सदर योजना ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ODOP) या धर्तीवर राबविली जाणार आहे. भंडारा जिल्हयाकरिता ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अंतर्गत धान आधारित उत्पादनाची निवड करण्यात आलेली आहे. ODOP अंतर्गत नवीन व सद्यस्थितीत कार्यरत तसेच NON ODOP अंतर्गत नवीन व सद्यस्थितीत कार्यरत सुक्ष्म अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे विस्तारीकरण, स्तरवृध्दी या लाभासाठी पात्र असतील. सदर योजनेला व्यापक स्वरुप देणेसाठी जिल्हयात कृषि विभागामार्फत 15 ते 31 ऑगस्ट 2022 दरम्यान कृषि प्रक्रिया जागृती पंधरवडा साजरा केला जात आहे.

या पंधरवडयात खालीलप्रमाणे नियोजन करण्यात येत आहे. 15 ऑगस्ट -स्वांतत्र्यदिनी सर्व ग्रामसंभामध्ये कृषि सहाय्यक योजनेची प्रचार व प्रसिध्दी करतील. इच्छुक, पात्र व सक्षम (Potential) लाभार्थी व गट यांची माहिती आवश्यक कागदपत्रांच्या प्रती घेऊन माहिती जिल्हा संसाधन व्यक्तीकडे सुपुर्त करतील, 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट बँकाकडे जे प्रकल्प आराखडे मंजुरीस्तव सादर केले आहेत, त्यांचे बॅकांच्या शाखा व्यवस्थापकांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येऊन लाभार्थ्यांचे कागदपत्रांची बँक अधिकाऱ्या समक्ष पडताळणी करुन त्रुटींची पुर्तता करुन घेण्यात येईल. तसेच लाभार्थ्यांचे सविस्तर प्रकल्प अराखडे (DPR) तयार करुन विहित कार्यपध्दतीनुसार ऑनलाईन प्रस्ताव बँकेकडे कर्ज मंजुरीस्तव सादर करतील. जिल्हास्तरावरील प्रस्ताव प्रलंबित असणाऱ्या बँक, संबंधित कृषि अधिकारी, जिल्हा संसाधन व्यक्ती, बँक शाखा व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येईल.

इच्छुक शेतकरी, शेतकरी समुह, व्यक्ती व स्वंयसहायता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्थांनी प्रकल्प उभारणी अर्थ सहाय्यासाठी व योजनेबाबतच्या मार्गदर्शक सुचना व ऑनलाईन अर्ज https://pmfme.mofpi.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध असुन योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तरी योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि