आपले सरकार सेवा केंद्र स्थापन अर्ज स्विकृतीस मुदतवाढ 

आपले सरकार सेवा केंद्र स्थापन अर्ज स्विकृतीस मुदतवाढ 

गडचिरोली,दि.12:महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) शासन निर्णय दिनांक 19 जानेवारी 2018 अन्वये राज्यातील ग्रामिण व शहरी भागात नागरिकांपर्यत शासकीय,निमशासकिय व खाजगी सेवा पोहचविण्याकरीता प्रत्येक ग्राम पंचायतस्तरावर व नगर परिषद,नगर पंचायतस्तरावर आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाचे असल्यामुळे,गडचिरोली जिल्हयातील रिक्त असलेल्या 343 ग्राम पंचायतस्तरावर व 03 नगर पंचायतस्तरावर आपले सरकार सेवा केंद्र रिक्त असल्याने महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) शासन निर्णय दिनांक 19 जानेवारी 2018 च्या परिच्छेद 1 (अ) व (आ) मधिल निकषानुसार ग्राम पंचायतस्तरावर 351 व नगर पंचायतस्तरावर 03 आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाचे आहे.

करीता आपले सरकार सेवा केंद्र अर्ज स्विकारण्याची दिनांक 5 ऑगस्ट्र 2022 पर्यत देण्यात आली होती परंतु जिल्हयात निर्माण झालेल्या पुर परिस्थितीमुळे अपेक्षित अर्ज संख्या प्राप्त न झाल्याने अर्ज सादर करण्यास पुनश्च दिनांक 25 ऑगस्ट्र 2022 चे कार्यालयीन वेळेपर्यत अर्ज स्विकृत करण्यात येतील. गडचिरोली जिल्हयात रिक्त असलेल्या 343 ग्राम पंचायत व 03 नगर पंचायतची यादी व अर्जाचा नमुना,जिल्हयाच्या वेबसाईट (www.gadchiroli.gov.in) या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे,असे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.