जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोलीमार्फत विविध स्पर्धेंचे आयोजन पोस्टर स्पर्धा, तिरंग्यासह कुटुंबाची सेल्फी व माध्यमांसाठी स्पर्धा

जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोलीमार्फत विविध स्पर्धेंचे आयोजन

पोस्टर स्पर्धा, तिरंग्यासह कुटुंबाची सेल्फी व माध्यमांसाठी स्पर्धा

गडचिरोली, दि.11: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली मार्फत सर्व वयोगटातील व्यक्ती, युवक व युवतींसाठी पोस्टर स्पर्धा, तिरंग्यासह कुटुंबाची सेल्फी व वृत्त माध्यमांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामधे पोस्टर स्पर्धेसाठी स्पर्धकांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा या विषयी चांगला संदेश देणारे पोस्टर तयार करावयाचे आहे. पोस्टर तयार करण्यासाठी संगणक अथवा चित्रकलेचा वापर करता येईल. सदर पोस्टर अर्जासह कार्यालयात प्रत्यक्ष अथवा ईमेल diogadchiroli@gmail.com वर दि. 14 ऑगस्ट रोजी दुपारी 3.00 वा पर्यंत पाठविण्यात यावे.

तिरंग्यासह कुटुंबाची सेल्फी या स्पर्धेसाठी सहभागी स्पर्धकांनी हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत घरातील तिरंग्यासह कुटुंबाची सेल्फी घेवून diogadchiroli@gmail.com ईमेल वरती दि.14 ऑगस्ट रोजी दुपारी 3.00 वा पर्यंत पाठवायची आहे.

वृत्त माध्यमांसाठीच्या स्पर्धेत सर्व प्रकारच्या वृत्त माध्यमांमधील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबतची उत्कृष्ट प्रसिद्धी करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना सहभाग घेता येणार आहे. त्याबाबतची कात्रणे, व्हिडीओ किंवा ऑनलाईन वृत्त सोबत जोडून अर्ज दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी पर्यंत कार्यालयाच्या ई-मेलवर अथवा प्रत्यक्ष पाठविण्या यावे. दि.18 ऑगस्ट रोजी पर्यंतची केलेल्या प्रसिद्धीच्या बाबी यामध्ये लक्षात घेतल्या जाणार आहेत. तसेच स्पर्धकांनी आपले अर्जावर पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर लिहणे आवश्यक आहे.

निवडलेल्या तिन्ही प्रकारच्या स्पर्धकांना ट्रॉफी व प्रशस्त‍िपत्रक देण्यात येणार आहे. पोस्टर स्पर्धा, तिरंग्यासह कुटुंबाची सेल्फी या प्रकारातील प्रथम तीन पोस्टर व सेल्फी जिल्हा प्रशासनाच्या दि.15 ऑगस्ट रोजीच्या मुख्य कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच निवडलेल्या माध्यम प्रतिनिधी स्पेर्धेतील 3 विजेत्यांना पुढिल शासकीय कार्यक्रमात ट्रॉफी व प्रशस्त‍िपत्रक द्वारे सन्मानित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी केले आहे.