भंडारावासीयांना रानभाज्यांची चव चाखायला मिळणार

भंडारावासीयांना रानभाज्यांची चव चाखायला मिळणार

भंडारा, दि. 11 : तालुका कृषी अधिकारी कार्यालय सिव्हिल लाईन, येथे उद्या 12 ऑगस्टला रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 45 प्रकारच्या रानभाज्याचा समावेश असलेल्या या महोत्सवाचे कृषी विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), यांनी आयोजन केले आहे.

या रानभाजी महोत्सवासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण बलसाने, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, भंडाराचे तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांच्यासह कृषी अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित राहणार आहेत.

या रानभाजी महोत्सवामध्ये रानातील नैसर्गिकरीत्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्यांचे नमुने ठेवण्यात येणार आहे त्यात शेवगा, तरोटा, पातूर, केना, मोहफुलें, अंबाडी, करवंद, तांदुळजा, अडुळसा, उंदिरकांन, हरदोली, शेरडीरे, वसंवेल इत्यादी जवळपास 45 प्रकारच्या रानभाज्या व त्यांची पाककृती प्रदर्शनामध्ये ठेवून त्यांचे दैनंदिन आरोग्यामध्ये असणारे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. या महोत्सवाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने भेट देऊन रानभाज्यांचे मानवी आहारातील महत्व, औषधी गुणधर्म, त्यामध्ये असणारे जीवनसत्वे, व्हिटॅमिन आणि विशेषतः नैसर्गिक रित्या असल्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारचे कीटकनाशकांची फवारणी नसल्याने ते विषमुक्त म्हणून आरोग्यासाठी आरोग्यदायी असून त्यांचा जास्तीत जास्त मानवी आहारामध्ये सेवन करावे व रोगमुक्त जीवन कसे जगता येईल याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले आहे.