धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांसाठी पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना

0

धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांसाठी पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना

गडचिरोली, दि.10: राज्यातील “धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित/ विना अनुदानित/कायम विना अनुदानित शाळा,कनिष्ठ महाविद्यालये,औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना” अल्पसंख्याक विकास विभागाच्या शासन निर्णय, दि.७.१०.२०१५ अन्वये राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरीता अनुदान मिळवू इच्छिणा-या अल्पसंख्याक बहूल शासनमान्य खाजगी शाळा,अपंग शाळा व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून सदरबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालय, नियोजन भवन, गडचिरोली येथे दि. ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा. प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन त्रुटीची पुर्तता करवुन अंतिमरित्या सदर योजने अंतर्गत अनुदानास पात्र होणाऱ्या संस्थांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास सादर करण्यात येईल,असे जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव,जिल्हा नियोजन समिती गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here