हुतात्म्यांचे बलिदान व लढा स्मरणातून कामय जिवंत राहील – आयुक्त राजेश मोहीते

हुतात्म्यांचे बलिदान व लढा स्मरणातून कामय जिवंत राहील – आयुक्त राजेश मोहीते

ऑगस्ट क्रांती दिनी मनपाकडून हुतात्मा स्मारकावर वाहिली आदरांजली

· विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती

चंद्रपूर, दि. 9 ऑगस्ट : देशाच्या स्वातंत्र्यात 9 ऑगस्ट या ऑगस्ट क्रांती दिनाला विशेष महत्व आहे. देशाला स्वातंत्र्याच्या प्रकाशात आणण्यासाठी ज्या हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांचा स्मृतीदिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी छोडो भारत आंदोलनाची गर्जना केली होती. या हुतात्म्यांचे बलिदान कायम स्मरणात ठेवून या हुतात्म्यांचा व स्वातंत्र लढ्यातील सैनिकांचा आदर्श घेण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालीका आयुक्त राजेश मोहीते यांनी उपस्थितांना केले.

चंद्रपूर शहर महानगरपालीकेकडून हुतात्मा स्मारक वाचनालय येथे आयोजीत आदरांजली कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. शहरातील हुतात्मा स्मारक वाचनालय परिसर येथे सकाळी 10.00 वाजता ध्वजारोहन व हुतात्मा स्मारकाला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मनपा उपायुक्त अशोक गराटे, सहाय्यक आयुक्त विद्या पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांकडून मानवंदना देण्यात आली. महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. यावेळी मनपा अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सहभागी होवून आदरांजली अर्पण केली.