येत्या बुधवारी भंडाऱ्यात भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला 10 हजार तर प्रोत्साहन बक्षिसांची लयलुट

येत्या बुधवारी भंडाऱ्यात भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला 10 हजार तर प्रोत्साहन बक्षिसांची लयलुट

सहभागी व्हा व मिळवा रोख बक्षीसे

इच्छुकांनी सहभागासाठी (8999705415) वर संपर्क करावा  – जिल्हाधिकारी संदीप कदम

भंडारा दि. 8 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त सध्या विविध उपक्रम जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहेत.त्यामध्ये सायकल स्पर्धा,सुर्यनमस्कार स्पर्धा यासह अन्य स्पर्धांचा सहभाग आहे.मात्र जिल्हयातील भव्य मॅराथॉन येत्या बुधवारी म्हणजे 10 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे.17 ते 45 या वयोगटातील सर्व तरूण तरूणी,गृहीणी,विदयार्थी यासह नागरिक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

भंडारा शहरात भव्य मॅराथॉन स्पर्धचे आयोजन येत्या 10 ऑगस्ट (बुधवार ) रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा खात रोड ते खुर्शीपार पर्यंत 5 कि.मी. जाणे व 5 कि.मी. परत येणे असे एकुण 10 कि.मी.ची असून स्पर्धेचा समारोप माधव नगर खात रोड येथे होणार आहे. विशेष म्हणजे या मॅराथॉन स्पर्धेला बुधवारी सकाळी 7 वाजता माधव नगर, खात रोड येथून सुरूवात होणार आहे.त्यामध्ये सहभागी होण्यासाठी खेळांडूनी ,स्पर्धकांनी सकाळी 5.30 वाजता उपस्थित राहावे.

भरघोस बक्षीस हे स्पर्धेच खास आकर्षण आहे. या मॅराथॉन स्पर्धेत विजेत्यांना भरघोस रोख रक्कमेचे बक्षीस मिळणार आहे.त्यामध्ये प्रथम क्रमांक 10 हजार रूपये रोख,व्दितीय 7000 हजार रूपये रोख ,तृतीय 5000 रूपये असे आहेत. पहील्या तीन बक्षीसानंतर चौथ्या ते दहाव्यापर्यत दहाव्या क्रमांकापर्यत विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी 500 रूपये प्रोत्साहनत्मक बक्षीस म्हणून रोख पारितोषीक देण्यात येईल. ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे.तरी जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील सर्व मॅराथॉन स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे ,आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. स्पर्धेतील सहभागासाठी संपर्क क्रमांक 8999705415 मंगेश गुडधे व सुरेश रेहपाडे 7841005330 या क्रमांकावर संपर्क करावा.