गडचिरोली जिल्हयात आज 021 कोरोनामुक्त, तर 13 कोरोनाबाधित

गडचिरोली जिल्हयात आज 021 कोरोनामुक्त, तर 13 कोरोनाबाधित

 

गडचिरोली,(जिमाका)दि.07: आज गडचिरोली जिल्हयात 462 कोरोना तपासण्यांपैकी आज नवीन कोरोना बाधितांची संख्या 13 असून 21 जणाने कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37854 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36996 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 82 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 776 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.77टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.22 टक्के तर मृत्यू दर 2.05 टक्के झाला आहे.

आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 05,अहेरी तालुक्यातील 03, भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 01, मुलचेरा तालुक्यातील 02, वडसा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 07,अहेरी तालुक्यातील 03, आरमोरी तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 06, धानोरा तालुक्यातील 02, तसेच कुरखेडा तालुक्यातील 02 जणाचा समावेश आहे.