इतिहासातीलप्रथम आदिवासी महिला श्रीमती .द्रौपदीजी मर्मू राष्ट्रपती निवडमुळे आदिवासी एकत्र येणार- मधुकरजी मडावी.

इतिहासातीलप्रथम आदिवासी महिला श्रीमती .द्रौपदीजी मर्मू राष्ट्रपती निवडमुळे आदिवासी एकत्र येणार- मधुकरजी मडावी.

भारतात आदिवासी जनजाती 21000 असून गावामध्ये प्रचंड उत्साहा आणि उत्सव सुरु आहे. 675000 अधिक मताने राष्ट्रपती श्रीमती.द्रौपदीजी मुर्मू यांना मतदार झाला या देशाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा आनंद आणि देशाच्या सर्वोच्च भवनात विराजमान आदिवासी महिला झाल्या त्यामुळे समस्त भारतीय आदिवासी समाजात प्रेमभाव,स्नेहभाव सामाजिक बांधिलकी आणि रुढी परंपरा संस्कृती साम्याचे तमाम आदिवासी भारतीय समाजात दर्शनव एकता दिसून येत असल्यामुळे समस्त आदिवासी समाज एकत्र येणार मधुकरजी मडावी माजी सभापती पं.स.सिंदेवाही यांनी असे प्रतिपादन केले. भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा चंद्रपुर शाखेच्या वतिने कार्यक्रमाचे आयोजन वासेरा ता.सिंदेवाही जि.चंद्रपुर ग्रा.पं कार्यालय वासेरा येथे इतिहासातील प्रथम आदिवासी महिला श्रीमती.द्रौपदीजी मुर्मू यांची महामहिम राष्ट्रपती पदी निवड झाल्याबद्दल ग्रा.पं. कार्यालय वासेरा यांना राष्ट्रपती महोदय यांची प्रतिमा सप्रेम भेट देण्यात आली . या कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास कुंभरे महामंत्री भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा चंद्रपुर, महेश पाटील बोरकर सरपंच वासेरा, मधुकरजी मडावी माजी सभापती पं.स, सौ.मंदाताई मुनघाटे उपसरपंच वासेरा,मुरलीधर मडावी भाजपा तालुका अध्यक्ष अनुसूचित जमाती ,शिलाताई कन्नाके माजी.उपसभापती, देवेंद्र तलांडे पोलीस पाटील,श्री.वाघमारे ग्राम सेवक ,ग्रामपंचायत सदस्य सुरेखा चिमलवार ,मंगेश बंडीवार,निदांत पेंदाम,यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून महेश पाटील बोरकर सरपंच वासेरा प्रतिपादन करतांना म्हंटले की, वासेरा हा गाव जंगल व्यापी असून आदिवासी समाज बहुसंख्येने रहिवासी आहेत . आदिवासी योजनेकयिता प्रशासनाने लक्ष्य देण्याची गरज आहे. वासेरा ग्रामपंचायतला जिल्हा भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या वतिने श्रीमती.द्रौपदीजी मुर्मू भाजपा आदरणीय राष्ट्रपती यांची प्रतीमा भेट दिली. हे वासेरा गावाच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचे क्षण व आनंद आहे. असे प्रतिपादन महेश पाटील बोरकर यांनी केले. याप्रसंगी मुरलीधर मडावी यांनी म्हंटले की,भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सरकारने आदिवासीचे महत्वाचे प्रश्न आदिवासी महान नेत्याच्या निवेदनानुसार सोडविले. तो प्रश्न समाजाच्या जिव्हाळयाचा होता. त्या महान नेत्याच्या कार्याकडे आदिवासी समाजाने दुर्लक्ष करू नये. विश्व गौरव भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी राष्ट्रपती पदाकरिता श्रीमती.द्रौपदीजी मुर्मू यांच्या नावाची शिफारस केली व विक्रमी मताने निवडून आणले .ही बाब समस्त आदिवासीसाठी गौरवाची आहे. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निखिल कोवे ग्रामपंचायत सदस्य वासेरा यांनी केले. कार्यक्रमाकरिता विशेष प्रयत्न शामरावजी कोवे भुमक आहाके ,वासुदेव कोवे ,मनोहर वलके वासेरा वासिय जनता बहुसंख्येने उपस्थित होते