जिल्हा आपत्तीच्या चॅटबोटला उत्तम प्रतिसाद चार हजारावर नागरिकांनी संपर्क करून घेतली माहिती

जिल्हा आपत्तीच्या चॅटबोटला उत्तम प्रतिसाद चार हजारावर नागरिकांनी संपर्क करून घेतली माहिती

भंडारा, दि. 5 :आपत्ती नियंत्रण कक्षाचे कल्पक अधिकारी अभिषेक नामदास यांनी स्व:त विकसीत केलेल्या चॅटबोटला उत्तम प्रतिसाद मिळत असून 29 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान चार हजारहून अधिक नागरिकांनी या चॅटबोटवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून माहिती प्राप्त केली आहे.

जिल्हा प्रशासनातील आपत्ती नियंत्रण कक्षाला पूरपरिस्थीती कींवा अन्य कोणत्याही आपत्तीत माहिती घेण्या व देण्यासाठी दक्ष राहावे लागते.नियंत्रण कक्षाच्या नियमीत संपर्क 07184-2511222 क्रमांकाव्यतीरीक्त या डिजीटल कार्यप्रणालीने योग्य माहितीची मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.

9767968166 या क्रमांकावर चॅटबोट असून तो सेव्ह केल्यावर त्या नंबरवर hi मेसेज करावा. त्यानंतर पर्जन्यमान, नदी, धरण पातळी अहवाल, विशेष सूचना, बंद रस्ते, संपर्क तुटलेली गावे, वीज बचावाच्या सूचना आदी माहिती त्या माहितीचे अनुक्रमांक टाकत गेल्यास मिळते.

 

वापरास अत्यंत सोपी व सुलभ व अचूक माहितीने ही चॅटबोट प्रणाली लोकप्रिय ठरली आहे. प्रभावी आपत्ती नियंत्रणाच्या दृष्ट्रीने अचुक माहिती नागरिकांना या चॅटबोटव्दारे जात आहे. नियंत्रण कक्षाच्या या चॅटबोटचा उपयोग नागरिकांनी करावा .- जिल्हाधिकारी