लाखांदूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारूप परिशिष्ट व नमुना ब वर आक्षेप किंवा सूचना आमंत्रित

लाखांदूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारूप परिशिष्ट व नमुना ब वर आक्षेप किंवा सूचना आमंत्रित

भंडारा, दि. 2 : लाखांदूर तालुक्यातील जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तिरखुरी, पालेपेंढरी, पाचगांव, सोनेगांव/घोडझरी, मासळ, पेंढरी, हरदोली, पाउलदवना, तई (बुज.), मांढळ, खोलमारा, जैतपुर, चिकना, मुरमाडी, तावशी, साखरा, दिघोरी (मोठी), बारव्हा, बोथली, धर्मापूरी, मानेगांव/बोर, भागडी, परसोडी/नाग, पाहूणगांव, आथली, आसोला, खैरी/घर, ढोलसर, सरांडी बुज, ओपारा, डोकेसरांडी, विरली (बुज.), राजनी, विरली (खुर्द), करांडला, ईटान, किरमटी, दोनाड, रोहणी, नांदेड, खैरणा, मोहरणा, कुडेगांव, गवराळा, खैरी/पट, डांभेविरली, विहीरगांव, दहेगांव, पिंपळगांव/को. मडेघाट व चप्राड या 51 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 जून 2022 रोजी प्रसिद्धी केलेल्या नमुना अ अंतिम प्रभाग रचना व आरक्षणावर 29 जुलै, 2022 पर्यंत प्रारुप आरक्षणावर कार्यवाही करुन दिनांक 1 ऑगस्ट, 2022 रोजी संबंधित ग्रामपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप परिशिष्ट 13 व अनुसूची नमुना “ब” संबंधित ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालय लाखांदूर येथील सूचना फलकावर सर्व नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रसिध्द करण्यात आले आहेत.

प्रसिध्द करण्यात आलेल्या परिशिष्ट 13 व अनुसूची नमुना “ब” वर कोणत्याही नागरीकांच्या आक्षेप किंवा सूचना असल्यास ते आक्षेप किंवा सूचना 3 ऑगस्ट, 2022 पर्यंत तहसील कार्यालय लाखांदूर येथील निवडणूक विभागात सादर करावे. 3 ऑगस्ट 2022 नंतर सादर केलेल्या आक्षेप व सूचनांचा विचार केला जाणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी.