धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याबाबत

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याबाबत

गडचिरोली, दि.02: धनगर समाजाच्या विद्यार्थ्यानी उच्च शिक्षणात मागे पडू नयेत, तसेच उच्च शिक्षणाच्या बदलत्या परिस्थितीशी त्यांना जुळवून घेणे शक्य व्हावे यासाठी या समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरीता सदर योजना राबविण्यात येत आहे.

इयत्ता पहिली पासुन ते इयत्ता बारावी पर्यत शिक्षण घेण्यास ही योजना राबविण्यात येत आहे. दरवर्षी किमान 100 विद्यार्थ्याची निवड याव्दारे करण्यात येणार आहे व निवड झालेल्या विद्यार्थ्याना जवळच्या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश मिळवून देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. जिल्हयाच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये इयत्ता पहिली पासुन ते इयत्ता बारावी पर्यतच्या विद्यार्थ्याना शिक्षण देऊ इच्छिणा-या इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवाशी शाळांच्या संस्थानी आपले प्रस्ताव विहीत नमुन्यात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय गडचिरोली येथे सादर करावेत. विस्तृत माहिती व विहीत नमुन्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय गडचिरोली या ठिकाणी संपर्क साधावा असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांनी कळविले आहे.