साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जिल्हा प्रशासनाकडून विनम्र अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जिल्हा प्रशासनाकडून विनम्र अभिवादन

गडचिरोली, दि.01: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनाजी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे, श्री. चतुर, श्री. चांभारे, श्री. चहांदे आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.