स्वंयरोजगार मार्गदर्शनाकरिता ऑनलाईन वेबिनार

स्वंयरोजगार मार्गदर्शनाकरिता ऑनलाईन वेबिनार

भंडारा,दि.30:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा या कार्यालयामार्फत 31 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत वेबिनारच्या माध्यमातून स्वंयरोजगाराकरिता शासनाच्या विविध महामंडळाच्या योजना या विषयावर ऑनलाईन समुपदेशन होणार आहे. या वेबिनारमध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
वेबिनारमध्ये प्रमुख मार्गदर्शक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व्ही. आर. ठाकुर, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे अनिल असवार, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक कल्पना भंगाळे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे दिलीप खडसे, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे सुधीर कानेकर हे स्वंयरोजगाराकरिता शासनाच्या महामंडळाच्या योजना या विषयावर ऑनलाईन समुपदेशन करणार आहे.
या वेबिनार मध्ये युवक, युवतींनी सहभागी होण्यासाठी गुगल मिट या ॲपचा उपयोग करावा. https://meet.google.com/hhh-wnxf-yxw या लिंकचा उपयोग करुन 31 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12 ते 1.30  वाजतापर्यंत ऑनलाईन वेबीनारमध्ये सहभागी होता येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा येथे 07184-252250 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा सहाय्यक आयुक्त शैलेश भगत यांनी केले आहे.