तालुक्यातील सहा गावांचा समावेश बफर झोनमध्ये करावा सिंदेवाही तालुका शिवसेना प्रमुख देवेंद्र मंडलवार यांची मागणी

तालुक्यातील सहा गावांचा समावेश बफर झोनमध्ये करावा सिंदेवाही तालुका शिवसेना प्रमुख देवेंद्र मंडलवार यांची मागणी

गडबोरी , वाकल , वानेरी , रामाळा , आणि टेकरी हे गाव बफर झोनच्या जंगलाला लागून आहेत, या गावांच्या शेजारील गाव ही बफर झोनमध्ये मोडतात आणि जंगल लागून असल्यामुळे या गावांमधील शेतामध्ये वाघ , बिबट , अस्वल असे प्राणी ठिय्या मांडून असतात त्यामुळे शेतकऱ्यांना अपल्याच शेतावर जायला आता भीती वाटते आजपर्यंत अनेक नागरिकांवर , पाळीव जनावरांवर त्यांच्या शेतात असो की गावात असो अनेक हल्ले झाले
पण या गावांचा समावेश हा बफर झोनमध्ये नसल्यामुळे अपघाताला मिळणारी रक्कम असो किंवा ज्या शासनाच्या विविध योजना फक्त बफर झोनसाठी येतात त्यांचा लाभ मात्र या गावांमधील शेतकऱ्यांना मिळत नाही , त्यामुळे आमच्या गावात सुद्धा हिंस्त्र प्राणी नेहमी येतात , आमच्यावर हल्ले करतात पण शासनाच्या ज्या योजना आहेत त्या मात्र बफर ला जास्त मिळतात त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुसकान होते , त्यामुळे या गावांचा समावेश बफर झोनमध्ये करावा अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होत आहे येथील शेतकऱ्यांकडून होत आहे , म्हणून शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र मंडलवार यांनी शिवणी बफर झोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुपे साहेब यांच्या मार्फत उपसंचालक बफर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांना निवेदन दिले निवेदन देतेवेळी चिकाटे क्षेत्र सहाय्यक , तुमराम पीआरटी समन्वयक हे उपस्थित होते