माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांसाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना

माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांसाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना

चंद्रपूर,दि. 18 ऑगस्ट: माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांनी शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये वर्ग 12 वी परीक्षेत 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करुन शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी कोणत्याही व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले असल्यास पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास पात्र आहेत. www.ksb.gov.in  वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2021 आहे.

 तरी, अशा पाल्यांनी मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे स्कॅन करून प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जासह अपलोड करावे.  

अपूर्ण किंवा चुकीचा अर्ज भरलेला असल्यास नाकारण्यात येईल. तरी सर्व संबंधित माजी सैनिक, विधवांनी आपापल्या पात्र पाल्यांचे ऑनलाईन अर्ज 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत भरावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, चंद्रपूर यांनी कळविले आहे.