चंद्रपूर : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर दि.12 ऑगस्ट : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            शनिवार दि. 14 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता, दिलाल कॉलनी, रेहमत नगर येथे डीपीडीसी मधून करण्यात आलेल्या विद्युत लाईनच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, दुपारी 12.30 ते 2 वाजेपर्यंतचा वेळ राखीव, दुपारी 2 वाजता नियोजन भवन, चंद्रपूर येथे डीपीडीसी बैठक, रात्री 8 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथे आगमन व मुक्काम.

रविवार दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 7.05 वाजता पक्षाच्यावतीने आयोजित गांधी चौक येथे ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथे शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 11 वाजता कृषी भवन, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय येथे रानभाजी  महोत्सव समारोपीय कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12 वाजता राजीव गांधी महाविद्यालय, मुल रोड, बंगाली कॅम्प, चंद्रपूर येथे दैनिक महाजागरण वृत्तपत्राच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. दुपारी 12.30 ते 1 वाजेपर्यंत वेळ राखीव. दुपारी 1 वाजता सावली कडे प्रयाण. दुपारी 2 वाजता सावली येथे आगमन व बौद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 2.30  वाजता नगरपंचायत सावली येथे रमाबाई सभागृहाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वाजता सावली, सहकारी शेतकरी राईस मिल जवळ, पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन समारंभास उपस्थिती. दुपारी 3.45 वाजता नगर परिषद प्रशासकीय इमारत लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता सावली येथून ब्रह्मपुरी कडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह,ब्रह्मपुरी येथे आगमन व मुक्काम.

सोमवार दि. 16 ऑगस्ट 2021 रोजी, सकाळी 8 वाजता ब्रह्मपुरी येथून चिमूर कडे प्रयाण. सकाळी 8.50 वाजता शासकीय विश्रामगृह,चिमूर येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वाजता चिमूर येथे ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शहीद स्मारकास अभिवादन. सकाळी 9.30 वाजता उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे शासकीय रक्तसाठा केंद्राचे उद्घाटन समारंभास उपस्थिती. सकाळी 10 वाजता चिमूर येथून नागपूरकडे प्रयाण.