चंद्रपूर : एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु Ø ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची अतिंम मुदत 31 ऑगस्ट पर्यंत

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु

Ø ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची अतिंम मुदत 31 ऑगस्ट पर्यंत

चंद्रपूर दि. 4 ऑगस्ट: आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यान्वित इंग्रजी माध्यमाच्या   (सीबीएसई) सर्व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल मधील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6वी च्या वर्गात नियमित प्रवेश तसेच इयत्ता 7 ते 9 वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरिता अनुसूचित, आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

त्यासाठी  https://admission.emrsmaharashtra.com ही  लिंक  उपलब्ध  करुन  देण्यात आली  आहे.

प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी दिलेल्या लिंकवर आवेदनपत्र ऑनलाईन भरुन त्यासोबत मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करावयाचे आहे. अनुसूचित जमातीच्या ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 6 लाख पेक्षा कमी आहे, अशा पालकांच्या पाल्यांना प्रवेशासाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरता येईल. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता अर्जदार विद्यार्थ्याचा सरल पोर्टलवरील विद्यार्थी आयडी व मोबाईल क्रमांक (ओटीपी करिता) आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याबाबतची सविस्तर माहिती लिंकवर देण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची अंतिम मुदत दि.31 ऑगस्ट 2021 पर्यंत असणार आहे.

तरी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील अनुसूचित, आदिम जमातीच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल मध्ये प्रवेश घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी नजीकच्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा येथील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर येथे संपर्क करावा. असे आवाहन चंद्रपूर आदिवासी विकास विभागाचे, प्रकल्प अधिकारी रोहन घुगे तसेच चिमुरचे प्रकल्प अधिकारी के.ई. बावनकर यांनी कळविले आहे.