शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण बलसाने

शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण बलसाने

भंडारा, दि. 27 : महाराष्ट्रात अतिवृष्टी अवकाळी पाऊस व दुष्काळ या सारख्या नैसर्गिक आपत्तिमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पीक विमा योजना अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना फायद्याची ठरते. योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अर्जदार शेतकऱ्याने स्थानिक नैसर्गिक आपत्ती (गारपीट, भुस्खलन, विमा संरक्षण क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग) व काढणी पश्चात नुकसान (गारपिट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस व बिगर मोसमी पाऊस) या बाबी अंतर्गत सुकवणीसाठी शेतात पसरवुन ठेवलेल्या अधिसुचित पिकांचे काढणी नंतर 14 दिवसा पर्यंत झालेल्या नुकसानीची पुर्व सुचना नुकसानीच्या 72 तासाच्या आत Crop Insurance App /विमा कंपनीचा टोल फ्री (18004195004) क्रमांक/बँक/संबंधित बँक/कृषि विभाग यांना द्यावी. ही जोखिम भंडारा जिल्ह्यात अधिसूचित क्षेत्रातील अधिसुचित भात व सोयाबीन पिकास लागू होईल. योजनेअंतर्गत अधिसूचित क्षेत्रात पिकांचे सरासरी उत्पन्नाची उंबरठा उत्पन्नाशी तुलना करुन येणा-या घटीनुसार व योजनेच्या मार्गदर्शक सुचनेच्या अधिन राहुन अधिसूचित क्षेत्रात नुकसान भरपाई निश्चित केली जाते.

भंडारा जिल्ह्याकरीता ऍ़ग्रिकल्चर इंन्सुरंस कंपनी ऑफ इंडीयाची एक वर्षासाठी नियुक्ती पिक विमा कंपनी म्हणून करण्यात आली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभागी होऊन जिल्ह्याकरिता खरीप हंगाम करीता अधिसूचित भात व सोयाबिन पिकाचा विमा काढून पिक संरक्षण करण्यासाठी प्रचार व प्रसिद्धी करण्याच्या उद्देशाने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ऍ़ग्रिकल्चर इंन्सुरंस कंपनी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचे संयुक्त विद्यमाने चित्ररथ करण्यात आला. या चित्ररथास जिल्हाधिकारी संदिप कदम यांनी उद्‌घाटन करुन सुरुवात केली. पुढील 7 दिवस हा चित्ररथ भंडारा जिल्ह्यातील सर्व 7 तालुक्यात फिरुण प्रधानमंत्री पिक विमा योजनाची माहीती व महत्व शेतकऱ्यांना समजावून देणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत सहभागाची 31 जुलै 2022 ही शेवटची तारीख असून त्यापूर्वी पिक विमा काढणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहचावी या उद्देशाने गावा गावात प्रचार व प्रसिद्धी करण्याकरिता चित्ररथा द्वारचे उद्‌घाटन करण्यात आले. उद्‌घाटना दरम्यान जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अरुण बलसाने तसेच जि.प. कृषि अधिकारी विकास चैाधरी, अजय आटे, जिल्हा सल्लागार, जि.अ.कृ.अ.भंडारा, ऍ़ग्रिकल्चर इंन्सुरंस कंपनीचे जिल्हा स्तरावरील शरद रामटेके, जिल्हा समन्वयक व तालुका स्तरावरील दुधराम पालवे तालुका समन्वयक उपस्थित होते, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अरुण बलसाने यांनी कळविले आहे.