बॅंक ऑफ इंडिया देणार माविम स्थापित बचत गटांना कर्ज माविम व बॅंक ऑफ इंडिया यांच्यात करार

बॅंक ऑफ इंडिया देणार माविम स्थापित बचत गटांना कर्ज माविम व बॅंक ऑफ इंडिया यांच्यात करार

भंडारा, दि. 26 : महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडारा व जिल्हा अग्रणी बँक असलेली बॅंक ऑफ इंडिया यांच्यात माविम स्थापित बचत गटातील महिलांना उद्योग निर्मितीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी 26 जुलै 2022 रोजी आरसेटी कार्यालयात करार प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

यावेळी बँक आँफ इंडियाचे नागपूर विभागीय बँक प्रबंधक सुनील पाटील, नाबार्डचे सहा. महाप्रबंधक संदिप देवगीरकर, माविम भंडाराचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदिप काठोळे, बँक आँफ इंडिया जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक गणेश तईकर, माविम भंडाराचे सहा जिल्हा समन्वय अधिकारी मोहन घनोटे, आरसेटीचे व्यवस्थापक उपस्थित होते.

याप्रसंगी बँक आँफ इंडियाचे नागपूर विभागीय बँक प्रबंधक सुनील पाटील यांनी लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा, सचिव व व्यवस्थापक यांना महिला बचत गटांना उद्योग सुरू करून आर्थिक प्रगती साधण्यासाठी व व्यवसायवृद्धीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याविषयी मार्गदर्शन केले. या प्रक्रियेसाठी लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा, सचिव व व्यवस्थापक उपस्थित होते.