कृषि विभागाकडून संसधान व्यक्ती (Resource Person) या पदाकरीता अर्ज आमंत्रित

कृषि विभागाकडून संसधान व्यक्ती (Resource Person) या पदाकरीता अर्ज आमंत्रित

गडचिरोली, दि.22: आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PMFME) या केंद्र पुरस्कृत योजनेतंर्गत राज्य नोडल एजन्सीच्यावतीने जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा, हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तींची नामिकासुची (Panel Of Resource Persons) तयार करावयाची आहे. त्यासाठी सदर योजनेच्या मार्गदर्शक सुचनेतील संसाधन व्यक्ती (Resource Person) या पदाकरीता अर्ज मागविण्यात आले आहेत. संसधान व्यक्ती (Resource Person) या पदाकरीता पुढिल प्रमाणे शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे. कोणतीही योग्य व्यक्ती जसे सेवानिवृत्त शासकीय अधिकारी/कर्मचारी/ बॅक कर्मचारी/बॅक मित्र/विमा प्रतिनिधी/ वैयक्तिक व्यवसायिक /सहाय्य सल्लागार संस्था (Counsultancy firm) अथवा सुक्ष्म अन्न व्यवसायासाठी मदत करणाऱ्या व्यक्ती/ नामांकित राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय विदयापीठ/ संस्था यांचे कडील अन्न तंत्रज्ञान/ अन्न अभियांत्रिकी मधील पदविका/ पदवी. अथवा कृषी पदविधर/ इतर कोणत्याही शाखेतील पदवीधर/ज्या व्यक्तींना अन्न प्रक्रिया उदयोग, बॅकींग, सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणे व प्रशिक्षणाचा अनुभव आहे अशा व्यक्ती. तसेच या पदाकरीता अनुभव पुढीलप्रमाणे आहे. अन्न व कृषि प्रक्रिया उदयोग उभारणीचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविणे तसेच बँकेचा पाठपुरावा करुन कर्ज मंजुर करुन घेणे आवश्यक. अटी व शर्तीनुसार बंद लिफाफ्यातुन अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक अहर्ता व अनुभवाचे कागदपत्रासहित अर्ज सादर करण्याचा अतिम दिनांक 30 जुलै, 2022 राहील. योजनेच्या मार्गदर्शक सुचना, अर्जाचा नमुना सविस्तर पात्रता परिश्रमिक (मानधन) व इतर अटी या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली यांचे कार्यालयात उपलब्ध आहेत. तसेच कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in यावर सुध्दा उपलब्ध आहेत. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे. कार्यालयाचा पत्ता हा बॅराक नं. 01, जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली जवळ, सोनापुर कॉम्पलेक्स, गडचिरोली. पिन कोड- 442605

ई-मेल :- dsaogad15@gmail.comदुरध्वनी क्र. 07132-222593 असा आहे.