शासकीय व खासगी आस्थापना, सेवायोजना कार्यालयांना आवाहन

शासकीय व खासगी आस्थापना, सेवायोजना कार्यालयांना आवाहन

मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती सादर करा

गडचिरोली, दि.21:गडचिरोली जिल्हयातील सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना, सेवायोजन कार्यालये, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय, तसेच खाजगी क्षेत्रातील कायद्याअंतर्गत असणा-या आस्थापनांना त्यांच्या आस्थापणेवर असणा-या सर्व कर्मचा-यांची सांख्यिकी माहिती, प्रत्येक तिमाहीस, विषयांकीत सेवायोजन कार्यालये 1959 च्या कायद्यातील तरतुदीनुसार विहित नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पदधतीने सादर करणे बंधनकारक आहे. असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांनी केले आहे.

त्यानुसार मार्च-2022 अखेर संपणा-या तिमाहीची नमुना ई-आर-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,शासकीय संकुल बॅरेक क्र.-2, युनिट क्रमांक-2 कॉम्प्लेक्स, गडचिरोली या कार्यालयादवारे ऑनलाईन पदधतीने चालू असून या सर्व आस्थापनांकडुन 100 टक्के प्रतिसाद मिळणे अंत्यत आवश्यक आहे. या सर्व आस्थापनांना या कार्यालयाकडून यापूर्वीच युझरनेम व पासवर्ड देण्यांत आलेले आहेत. त्याचा वापर करुन प्रत्येकाने या विभागाच्या संकेतस्थळावर लॉगीन करावा व आपली अचूक माहिती ऑनलाईन पदधतीने सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 ही आहे. याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयास संपर्क साधावा. असे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी कळविले आहे.