कृषी विभागातर्फ गोदाम बांधकामासाठी अनूदान योजना

कृषी विभागातर्फ गोदाम बांधकामासाठी अनूदान योजना

गडचिरोली, .21: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य सन 2022-23 अंतर्गत धान्य उत्पादनाच्या सुरक्षित साठवणुकीसाठी व मूल्य वृद्धीसाठी गोदाम सुविधा आवश्यक आहे. ज्या ठिकाणी अन्नधान्य पिके घेतली जातात तथापि गोदामाची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी गोदामाचे बांधकाम करावे. राष्ट्रीय सुरक्षा अभियान कडधान्य कार्यक्रमानुसार जिल्ह्यास 2 गोदाम बांधकाम घटकाचे लक्षांक प्राप्त आहे.

250 मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त रुपये 12.50 लक्ष या पैकी जे कमी असेल ते अनुदान अनुदेय राहील. वरीलप्रमाणे योजनेकरीता सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील. सदर घटकासाठी शेतकरी उत्पादक संघ, कंपनी एफपीओ/ एफपीसी अर्ज करु शकतील. तरी इच्छुकांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात 31 जुलै पर्यंत अर्ज सादर कराण्यात यावे असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ब.स.मास्तोळी यानी आवाहन केले आहे.