आपत्ती व्यवस्थापन संचालक पदी आप्पासाहेब धुळाज

आपत्ती व्यवस्थापन संचालक पदी आप्पासाहेब धुळाज

मुबंई, दि. 20 : राज्याच्या महसूल व वन विभागांतर्गत आपत्ती व्यवस्थापन संचालक पदी आप्पासाहेब धुळाज रुजू झाले.

श्री. धुळाज यांनी यापूर्वी राज्य कामगार विमा योजना आयुक्त, कोल्हापूर आणि लातूर येथे अपर जिल्हाधिकारी आणि नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल विभागाचे उपायुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.