वाचनामुळे मनाचे उत्तम व्यवस्थापन होते – डॉ. गुरुप्रसाद पाखमोड़े                 

वाचनामुळे मनाचे उत्तम व्यवस्थापन होते – डॉ. गुरुप्रसाद पाखमोड़े                 

भंडारा, दि. 20 : वाचनामुळे मनाचे उत्तम व्यवस्थापन होते म्हणून मनुष्याने नियमित वाचन करावे व समाज व देशाच्या विकासात हातभार लावावे, असे उद्गार डॉ. गुरुप्रसाद पाखमोड़े माजी प्राचार्य, प्रगति महिला महाविद्यालय, भंडारा यांनी राष्ट्रीय वाचन दिवस कार्यक्रमात केले. ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, भंडारा या कार्यालयाद्वारे “राष्ट्रीय वाचन दिवस ” आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते.

केरळ राज्यातील ग्रंथालय चळवळीचे पितामह डॉ. पी.एन. पणिक्कर जन्मदिनानिमित्त दिनांक 18 जुलै रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, भंडारा येथे” राष्ट्रीय वाचन दिवस ” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटक शासकीय अध्यापक महाविद्यालय, भंडारा येथील प्राध्यापीका डॉ. श्रीमती सुलभा मुळे या होत्या तर प्रमुख पाहुणे नीलकंठ रणदिवे, माजी मुख्याध्यापक, नूतन महाराष्ट्र विद्यालय होते.

आजच्या आधुनिक काळात वाचन हे एक महत्वपूर्ण साधन असून मनुष्याच्या जीवनात अनेक बदल घडविन्याची ताकद देते तसेच व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते व जीवन मूल्यवर्धन होतो, असे उद्घाटक श्रीमती डॉ. मुळे यांनी प्रतिपादन केले.

वाचनाचे अनेक फायदे असून रामायण, महाभारत ते अगदी एकनाथ, तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्रग्रंथ एक चांगला मनुष्य घडवित असतो. सामाजिक समरसता स्थापीत होण्यास मदत होते तसेच आध्यात्मिक वाचनामुळे अनेक संकटाचा सामना करण्याची प्रेरणा मिळते म्हणून जो वाचेल तो वाचेल, असे प्रतिपादन नीलकंठ रणदिवे यांनी केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे तर सुत्र संचालन संजय नारनावरे यांनी व आभार राहुल रहांगडाले यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने अभ्यासीकेत विविध स्पर्धा परीक्षासाठी अभ्यास करणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.