अमरावती व नागपूर विभागातील महिला व युवतीकरिता Advanced Diploma in Software Programming चे मोफत निवासी व भोजन प्रशिक्षणा करिता नोंदणी करणे.

अमरावती व नागपूर विभागातील महिला व युवतीकरिता Advanced Diploma in Software Programming चे मोफत निवासी व भोजन प्रशिक्षणा करिता नोंदणी करणे.

गडचिरोली, दि.18: कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने केंद्र, राज्य पुरस्कृत “संकल्प” योजनेअंतर्गत या विभागातील महिला व युवतींकरिता “नवगुरुकुल फाऊंडेशन फॉर सोशल वेल्फेअर” या संस्थेदवारे Advanced Diploma in Software Programming चे 18 महिन्यांचे नि:शुल्क “निवासी प्रशिक्षण” श्री पंजाबराव देशमुख प्रबोधिनी, अमरावती येथे “पथदर्शी प्रकल्प्‍” म्हणून राबविण्यास मान्यता दिली आहे.

गडचिरोली जिल्हयातील महिला व युवतींकरिता Advanced Diploma in Software Programming चे मोफत निवासी व भोजन प्र‍शिक्षण घेणेकरिता प्रवेश प्रक्रिया पद्धती ज्यामध्ये 1) चाळणी परिक्षा 2) इग्रंजी प्रवीणता चाचणी 3) सामान्य गणित चाचणी 4) पालकांसोबत मुलाखत असे असेल ज्यामध्ये पहिला टप्पा ऑनलाईन परिक्षा, दिनांक 10 ते 30 जुलै 2022 दरम्यान राहील व दुसरा टप्पा ऑफलाईन परिक्षा, दि.07 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात येईल. तरी वरील परिक्षेकरिता नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रिया दिनांक 05 ते 30 जुलै 2022 पर्यंत राहील व नोंदणी करण्यांकरिता htttp://bitly.ws/sAaB या लिंकवर अर्ज करावे व अधिक माहिती करिता www.navgurukul.org व https://kaushalya.mahaswayam.gov.in तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयाशी संपर्क साधावा असे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी कळविले आहे.