डी.एल.एड प्रथम वर्ष प्रवेशासाठी मुदतवाढ

डी.एल.एड प्रथम वर्ष प्रवेशासाठी मुदतवाढ

भंडारा, दि. 18 : सन 2022-23 मधील डी. एल. एड. प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी 14 जुलै 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु सद्यस्थितीतील आपत्कालीन पूर परिस्थीतीचा विचार करता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पूणे यांनी डी. एल. एड. प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी 21 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.