सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या दांपत्यासाठी कन्यादान योजना

सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या दांपत्यासाठी कन्यादान योजना

भंडारा, दि. 13 : महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहूजन कल्याण विभागाच्या शासन निर्णयान्वये सामूहिक विवाह सोहळ्यात भाग घेऊन विवाह करणाऱ्या विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील दांपत्यासाठी सन 2019-20 पासून तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द दांपत्यांसाठी सन 2002-03 कन्यादान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यात भाग घेऊन विवाह करणाऱ्या वधुचे पालकास 20 हजार व संस्थेस प्रत्येक जोडप्यामागे 4 हजार अनुदान देण्यात येते.

सन 2022-23 वर्षाकरिता या योजनेंतर्गत अर्ज मागविण्यात येत असून सामूहिक विवाह सोहळ्यात भाग घेऊन विवाह करणाऱ्या दांपत्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांचेकडे सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या संस्थेमार्फत आवश्यक कागदपत्रांसह 31 जुलै 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय भंडारा येथे उपलब्ध आहे.