गडचिरोली येथे पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारांच्या मेळाव्याचे आयोजन

गडचिरोली येथे पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारांच्या मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूर, दि. 8 जुलै : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे दि. 11 जुलै 2022 रोजी पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. सदर मेळावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंतच्या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.

या मेळाव्यामध्ये औरंगाबाद, पुणे, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली येथील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. या मेळाव्यामध्ये उद्योजकांकडून उमेदवारांच्या प्राथमिक मुलाखती घेण्यात येणार आहे. मेळाव्याच्या अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली येथील 07132-222368 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

तरी, या मेळाव्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण सर्व ट्रेडच्या उमेदवारांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.