7 जुलै 2022 पासून अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय चंद्रपूर येथे सुरु

0

 7 जुलै 2022 पासून अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय चंद्रपूर येथे सुरु

गडचिरोली, दि.07:सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती,कार्यालय,चंद्रपूर हे कार्यालय प्रशासकीय भवन,जिल्हाधिकारी कार्यालय,दुसरा माळा,चंद्रपूर येथे दिनांक 7 जुलै,2022 रोजी सुरु करण्यात आले आहे.कार्यालयाचे उद्घाटन सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी,चंद्रपूर,रोहन घुगे,यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी सहआयुक्त तथा उपाध्यक्ष,जितेंद्र चौधरी,उपसंचालक,डिगांबर चव्हाण, पोलीस निरीक्षक,नितीन कुमार पाटील, पोलीस निरीक्षक,रविंद्र येरचे, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती गडचिरोली,अधिकारी,कार्यालयातील कर्मचारी, आकाश कुमरे, अभय मशाखेत्री,अमित शिवरकर,नितेश कोसरे,शनिदेव कन्नाके,प्रमोद डोळस,दिपक पडगेलवार,शास्त्रकार आदि कर्मचारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here