चंद्रपूर मनपामार्फत घरोघरी डेंग्यु जनजागृती

चंद्रपूर मनपामार्फत घरोघरी डेंग्यु जनजागृती

चंद्रपूर ७ जुलै – डेंग्यु व इतर कीटकजन्य आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत घरोघरी जनजागृती केल्या जात आहे. मनपा स्वच्छता विभागामार्फत स्वच्छता निरीक्षक, शिपाई तसेच घंटागाडी कर्मचारी यांच्या माध्यमातुन पत्रके वाटली जात आहेत.

डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांचा प्रसार या पावसाळ्यात होऊ नये या दृष्टीने महानगरपालिकेमार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे. आरोग्य विभागामार्फत एमपीडब्लू, एनएम व आशा वर्करद्वारा डासअळी उगमस्थाने शोधुन नष्ट करण्यास कंटेनर सर्वे राबविला जात आहे. यात दुषित घरे आढळत असल्याने सर्वांनीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सावधगिरी कशी बाळगावी याचे प्रसिद्धीपत्रक महानगरपालिकेतर्फे घरोघरी वाटण्यात येत आहे.

डेंग्युचा डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो त्यामुळे आपल्या घराची तपासणी करा. कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. पाणी साठवण्याची भांडी कोरडी करा. डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाका. पाणी साठा मोठा असले तर त्यात गप्पी मासे टाका. गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी खाऊन टाकतात ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो.

डेंगू हा जीवघेणा आजार आहे असल्याचे लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे डांस वाढीला प्रतिबंध हाच सर्वात उत्तम उपाय आहे. डेंग्यु रोगासंदर्भात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.