रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिर संपन्न

रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिर संपन्न

भंडारा, दि. 7 : नेहरू युवा केंद्र, युवा कार्यक्रम तसेच खेल मंत्रालय व कमांडो ग्रुप गोपीवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूर येथील हनुमान देवस्थानात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात रक्तदानासोबतच रक्तगट चाचणीही करण्यात आली. या रक्तदान शिबिराव्दारे संकलित रक्त अल्प दरात गोर गरीब रूग्णांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिबिराला युवा अधिकारी हितेंद्र वैद्य, समर्पण ब्लड बॅंकेचे डॉ. ओंकारदास बोरकर, डॉ.संदीप साखरवाडे, कमांडो ग्रुपचे चंद्रशेखर डोळस, हनुमान मंदिर संस्थानचे अध्यक्ष अविभाऊ कुंभारे, नेहरू युवा केंद्राचे रमेश अहिरकर, कोयल मेश्राम, अतुल गेडाम, अभिजीत मेश्राम, कमांडो ग्रुपचे योगेश गहाने, रितीक देवगडे, राज दंडारे, आकाश भोदे उपस्थित होते.