मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू

भंडारा, दि. 6 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारी शासकीय वसतिगृह सुरू झालेली असून सन 2022-23 या शैक्षणिक सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

शासकीय वसतिगृहामध्ये सन 2022-23 प्रवेशाकरिता शालेय विभागासाठी रिक्त जागेकरिता अंतिम दिनांक 15 जुलै 2022 आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन विभागासाठी अंतिम दिनांक 30 जुलै, बिगर व्यावसायिक विभागासाठी अंतिम दिनांक 24 ऑगस्ट 2022 व व्यावसायिक विभागासाठी अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2022 पर्यंत आहे. ज्या विद्यार्थी व विद्यार्थीनींना वसतिगृहामध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी शासकीय वसतिगृहातून प्रवेश अर्ज प्राप्त करुन निर्धारित मुदतीत सादर करावा. वसतिगृहामध्ये मोफत भोजन व निवास व्यवस्था, क्रीडांगण, ग्रंथालय, निर्वाह भत्ता, शालेय गणवेश, स्टेशनरी इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त मागसवर्गीय विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त, सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.