हातमाग विणकरांसाठी कौशल्य विकास करण्याकरीता केंद्र पुरस्कृत समर्थ योजना

हातमाग विणकरांसाठी कौशल्य विकास करण्याकरीता केंद्र पुरस्कृत समर्थ योजना

चंद्रपूर, दि. 4 जुलै : केंद्र शासनामार्फत समर्थ योजनेचे दिशा निर्देशाप्रमाणे हातमाग विणकरांसाठी कौशल्य विकास करण्याकरीता केंद्र पुरस्कृत समर्थ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेबाबतचे तपशिल व दिशा निर्देश Samarth-texttiles.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तरी, या योजनेअंतर्गत समर्थ प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याकरीता प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्था, अशासकीय संस्था, सहकारी संस्था, ट्रस्ट, कंपनी व इतर सेवाभावी संस्था व वस्त्रोद्योग विभागातील संस्था पात्र असल्यास प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग सीमा पांडे यांनी कळविले आहे.