कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही ” कृषि दिन “साजरा

कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही ” कृषि दिन “साजरा

कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही व विभागीय धान संशोधन केंद्र, सिंदेवाही यांच्या संयुक्त विद्यमाने हरीत क्रातींचे जनक, शेतक-यांचे कैवारी, कृषि विद्यापिठाचे जनक माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक यांच्या १०९ व्या जयंती निमित्त १ जुलै २०२२ रोजी कृषि दिनाचे आयोजन कृषि विज्ञान केंद्र , सिंदेवाही येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ. व्हि. जी नागदेवते , वरीष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही, प्रमुख उपस्थितीतमध्ये श्री. गणेश जगदाळे, तहसीलदार , सिंदेवाही आणि प्रमुख मार्गदर्शनामध्ये डाॅ. ए . व्ही. कोल्हे, सहयोगी संशोधन संचालक वि. कृ. सं. के , सिंदेवाही होते सदर कार्यक्रमाच्या वेळेस महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री . दिनेश शेंडे, मेंढाभाल, श्री. माधव आदे, सिंदेवाही, सौ .वर्षाताई लांजेवार, श्री.नरेश आडे ,श्री. अशोकराव सांगुळे या प्रगतशिल शेतक-यांचे प्रशस्तीपत्र देवुन कार्यालयातर्फे सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. विजय एन. सिडाम यांनी स्व.वसंतराव नाईक यांच्या कृषिमधील केलेल्या कार्याला उजाळा दिला. श्री. गणेश जगदाळे यांनी कृषि दिनाच्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा देवुन नवीन तंत्रज्ञान अवगत करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रमुख मार्गदर्शनामध्ये डाॅ. ए . व्ही. कोल्हे यांनी यांत्रिकीकरणाचा वापर व एकात्मीक किड व रोग व्यवस्थापनाविषयी सखोल मार्गदर्शन केले. डाॅ. एस. एन. लोखंडे यांनी भरडधान्याचे महत्व याविषयी आणि कु. स्नेहा वेलादी यांनी विद्यापिठाने विकसीत केलेल्या विविध यंत्रा विषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये डाॅ. व्ही. जी. नागदेवते यांनी खरीप पिकाचे नियोजन, धान पिकाच्या लागवडीच्या विविध पद्धती आणि खतांचे योग्य नियोजन याविषयी सखोल मार्गदर्शन केले आणि शेतकरी बांधवांना खरीप हंगामाकरीता शुभेच्छा दिल्या. तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि शेतक-यांना के . व्ही. के च्या प्रक्षेत्रावर भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन डाॅ. सोनाली लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाॅ. मदन वांढरे, डाॅ. जी. यु. काळुसे, श्री. एन. डी. बारसागडे. कु.अश्विनी रायपुरे, कैलास कामडी तसेच कृषि महाविद्यालय, नागपुर येथील RAWE चे विद्यार्थी आणि DAESI पदविका अभ्यासक्रमाचे निविष्ठाधारक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.